बालेकिल्ल्या वरील दुरावस्थेत असलेले सदर तसेच अनेक वाडे पाहीले अन ती दुरवस्था पाहून सर्वांना खूप वाईट वाटले आणि सर्व शिव पाईक बालेकिल्ल्यावर तासभर स्वच्छ्ता केली. काही जाणकार धाराकऱ्यांनी संपूर्ण गडाची माहिती सांगितली.सायंकाळी ठीक 5 वाजता राजगडावर पाहिलेल्या च्या प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणांना उजाळा देत गड उतार केला. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंदिरात ध्येय मंत्र म्हणून मोहिमेची सांगता केली.
परतीच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरू समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य असलेला श्री सज्जनगड किल्ला पाहिला. रामदास स्वामी यांची समाधी,11 मारुती मंदिरे, अंगाई माता मंदीर, रामघळी, भगवान श्री राम मंदीर गडावरील हि महत्वाची ठिकाणे पाहिली तेथील स्वच्छता केली आणि गड उतार झाले. विशेष म्हणजे हे शिव भक्त प्रत्येक रविवारी काकती येथील वीर कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्याचे संवर्धन करत असतात.