
Belagavi flyover project approved; work to begin soon
Belagavi: With Belagavi emerging as one of Karnataka’s fastest-growing cities, traffic congestion has become a major concern. In view of the city’s overall development, the
शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक काकती येथे सर्व शिवपाईक जमले. प्रेरणा मंत्राने मोहीमेला सुरुवात झाली. शनिवारी सकाळी ठीक वाजता सिंहगड च्या पायथ्या पासून वर चढत सिंहगडावर पोहचले. तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा देत गड न्याहाळला. पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, राजाराम महाराज यांची समाधी, तानाजी कडा तसेच गडावरील अनेक महत्वाची ठिकाणे पाहिली. काही काळ गड स्वच्छता केली. तेथे आलेल्या दुर्ग प्रेमींना गडाचे महत्व आणि गडावर स्वच्छता राखण्या बाबत माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे स्वराज्यासाठी , रयतेसाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वर डोकं टेकल आणि गड संवर्धनासाठी आशीर्वाद मागितला. तेथील स्मारकात महाराजांची गारद दिली तसेच महाराजांच्या, स्वराज्याच्या शिलेदारांच्या घोषणांनी गड परिसर दणाणून सोडला.
त्याच दिवशी सकाळी 10 च्या सुमारास कल्याण दरवाजा पासुन काही अंतरावरच असणाऱ्या चोर वाटेने गड उतार होऊन राजगडाकडे प्रस्थान केले. राजगडाकडे जाण्यासाठी या दुर्ग वीरांना एकूण 5 उंच उंच डोंगर एकाच दिवसात चढून उतरायचे होते. मार्ग खूप कठीण होता. दुपारची वेळ असल्या कारणाने सूर्य नारायण अगदी लाल होउन तळपत होता. काट्याकुट्यांची वास होती. दोन कठीण कडे पार करायचे होते. काही वेळ खूपच कठीण अशी चढाई,तर काही वेळ खूपच कठीण उतार होती. अनेकांच्या पायात काटे रुतत होते, ठेच लागत होती, पायाला असह्य वेदना होत होत्या , काही शिव भक्तांनी तर सुरुवाती पासूनच पायातील पादत्राणे घातली नव्हती, त्यांना तर अधिकच वेदना होत होत्या. हे ध्येयवेडे मनी फक्त राजगड ठेऊन चालत होते . शेवटी सर्व वेदना विसरून , कठीण कडे पार करतं राजगडाच्या पायथ्याशी सायंकाळी पोहचले. थकलेल्या चेहऱ्यानी रात्री विश्रांती घेतली सकाळी पहाटे 5 वाजता आपल्या ध्येयाकडे अर्थातच राजगडा कडे वाटचाल करु लागले. सर्वांत कठीण मार्ग असणाऱ्या गुंजवणे गावातून जाणाऱ्या चोर दरवाजाने हर हर महादेव चि गर्जना करतं , मुखी महाराजांचे नाव घेत राजगडावर पोहचले. राजगडावर पोहचताच त्यांना जणू स्वर्गात आल्याचा भास झाला. त्या स्वर्गाची हवा खात गड पाहू लागले सुरुवातीस पद्मावती माची आणि सईबाईंची समाधी पहिली नंतर सुवेळा माची तेथील नेढे , डुबा तसेच चिलखती बुरुज आणि अनेक मंदीर पाहिली. दुपारी रकरकत्या उन्हात संजिवनी माची पहिली . त्याच दिवशी भर उन्हात सर्वात कठीण असा राजगड चा बालेकिल्ला चढला.
बालेकिल्ल्या वरील दुरावस्थेत असलेले सदर तसेच अनेक वाडे पाहीले अन ती दुरवस्था पाहून सर्वांना खूप वाईट वाटले आणि सर्व शिव पाईक बालेकिल्ल्यावर तासभर स्वच्छ्ता केली. काही जाणकार धाराकऱ्यांनी संपूर्ण गडाची माहिती सांगितली.सायंकाळी ठीक 5 वाजता राजगडावर पाहिलेल्या च्या प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणांना उजाळा देत गड उतार केला. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मंदिरात ध्येय मंत्र म्हणून मोहिमेची सांगता केली.
परतीच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरू समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य असलेला श्री सज्जनगड किल्ला पाहिला. रामदास स्वामी यांची समाधी,11 मारुती मंदिरे, अंगाई माता मंदीर, रामघळी, भगवान श्री राम मंदीर गडावरील हि महत्वाची ठिकाणे पाहिली तेथील स्वच्छता केली आणि गड उतार झाले. विशेष म्हणजे हे शिव भक्त प्रत्येक रविवारी काकती येथील वीर कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्याचे संवर्धन करत असतात.

Belagavi: With Belagavi emerging as one of Karnataka’s fastest-growing cities, traffic congestion has become a major concern. In view of the city’s overall development, the

Belagavi: A tragic accident claimed the life of a 10-year-old schoolboy and left two other students seriously injured after a cement-laden truck toppled near Sirgur

Belagavi: MLA Asif (Raju) Sait has announced plans to set up a well-equipped chess park at Sardar High School to help students make constructive use

Belagavi: The All India Democratic Students Organisation (AIDSO) has demanded an investigation into alleged irregularities at Rani Chennamma University, Belagavi, citing reports of multi-crore corruption.For

Ugaragol: Yellamma Gudda is fully prepared to host the Banada Hunnime fair on January 3, with lakhs of devotees expected from across the country. The

Rajya Sabha MP Iranna Kadadi has informed Lok Sabha Speaker Om Birla that the Belagavi district administration acted within the law while prohibiting Maharashtra MP